Breaking News

दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

पनवेल महापालिकेच्या वतीने चोख व्यवस्था

पनवेल : रामप्रहर वृत्त

तू सखःकर्ता तू दुखःहर्ता म्हणत गणरायाचे शुक्रवारी वाजत-गाजत घरोघरी आगमन झाले. एका दिवसाची सेवा केल्यानंतर दीड दिवसाच्या गणरायाला शनिवारी (दि. 11) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. याकरिता पनवेल महापलिकेच्या वतीने विविध उपायोजना केल्या होत्या.

पनवेल शहरातील कोळीवाडा, बल्लाळेश्वर तलाव, तक्का या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती विर्सजित करण्यात आल्या. या करिता महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागले नाही. या संदर्भात पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे यांनी माहिती दिली, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी मित्र मंडळ, भाजप वॉर्ड क्रमांक 19, मिडलक्लास हौसिंग सोसायटी कमिटी पनवेल महापालिका आणि कोशिश फाउंडेशनच्या वतीने घरगुती गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याकरिता स्वतंत्र पिंप उपलब्ध करण्यात आले होते. या ठिकाणी दोन फुटी शाडूच्या मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, तसेच विसर्जनाकरिता आलेल्या गणेशभक्तांना कोशिश फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply