Breaking News

भोर घाटात दरड सत्र सुरूच

महाड-पुणे प्रवास काही तासांकरिता ठप्प

महाड : प्रतिनिधी

जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीत महाड भोर वरंध या मार्गाचे प्रचंड नुकसान झाले होते. महाड भोर पुणे घाटात दरडी कोसळल्याने हा मार्ग जवळपास महिनाभर बंद होता. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला हा मार्ग शनिवारी (दि. 11) पुन्हा आलेल्या दरडीने बंद झाला होता. प्रशासनाने ही दरड तत्काळ हटवून मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.

महाड वरंध भोर पुणे या मार्गाचे जुलैमधील अतिवृषित नुकसान झाल्याने जवळपास महिनाभर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. महाड प्रशासनाकडून वरंध घाट रस्त्यावरील अडथळे दूर केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला होता, मात्र शुक्रवारी रात्री 2 वाजता पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत पुन्हा दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आणि वाहतूक अनेक तासांनी पुन्हा सुरळीत करण्यात आली. गेले दोन दिवसांपासून विविध भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. यामुळे आधीच नादुरुस्त झालेल्या महाड भोर पुणे मार्गावर दरडींचा धोका कायम आहे. यामुळे मुसळधार पावसाच्या धोक्याच्या इशार्‍यानंतर नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळले पाहिजे, असे सांगण्यात आले आहे.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply