Breaking News

श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित

कोलंबो ः वृत्तसंस्था

श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित केले आहे.

रविवारच्या साखळी बॉम्बस्फोटांतील मृतांचा आकडा 290वर पोहचला आहे. यात चार जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सात भारतीयांचा समावेश आहे. जेडीएसचे कार्यकर्ते एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. स्फोट झाले तेव्हा ते एका हॉटेलात थांबले होते, मात्र अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. श्रीलंकेचे पोलीस या दहशतवादी हल्ल्यातील धागेदोरे जुळवण्याच्या कामाला लागले आहेत. आतापर्यंत सुमारे 24 लोकांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी संघटनेला बाहेरील देशांमधून मदत मिळाली का, याचा तपास सुरू असल्याचे श्रीलंका सरकारचे मंत्री सेनारत्ने यांनी म्हटले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply