Sunday , September 24 2023

मावळची निवडणूक मोदी विरुद्ध पवार

भाजप नेते महेश बालदी यांचे प्रतिपादन

जेएनपीटी : प्रतिनिधी

मावळ  मतदारसंघात पवारविरोधात मोदी असा सामना रंगणार आहे. तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागा विजय आपलाच आहे, असे वक्तव्य भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी केले आहे.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी निवडणुकीसंदर्भात बोलताना  सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उरण विधानसभा मतदारसंघात जनतेला तसे प्रकल्पग्रस्ताना भेडसावणार्‍या समस्यांचे निवारण करण्याचे काम जे या अगोदरच्या आघाडीच्या सरकारला जमले नाही ते काम केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने करून दाखविले आहे. त्यामुळे आज 190 उरण विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने वाढत आहे. हे आज आपण पाहत आहोत.

Check Also

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …

Leave a Reply