Breaking News

मेंदूच्या विकारांविषयी रुग्णांमध्ये जागरूकता आणावी -डॉ. हितेंद्र दहिवडकर

कर्जत : बातमीदार : गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेजसारखे आजार उद्भवू लागले आहेत. हे आजार प्रामुख्याने स्ट्रेस निर्माण होऊन होत असल्याने रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी वैद्यक क्षेत्रात काम करणार्‍यांची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. हितेंद्र दहिवडकर यांनी कर्जतमध्ये केले. कर्जत मेडिकल असोसिएशनची रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील रॉयल गार्डनच्या सीबीसी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हितेंद्र दहिवडकर बोलत होते. प्रामुख्याने ताणतणाव आणि बदललेली जीवनशैली याचा सर्वाधिक परिणाम मेंदूवर पडतो असे  सिद्ध झाले आहे. त्यामुळे ते रोखण्याचा सल्ला रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक यांना दिला पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. ज्युपिटर रुग्णालयाचे डॉ. स्वप्नील कपोते यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कर्जत मेडिकल असोसिएशनच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीचा गौरव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष कुलकर्णी यांनी केले.असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. स्वप्नील पडते यांच्याकडून डॉ. गणेश साळुंखे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर मावळते सचिव डॉ. निलेश म्हात्रे यांच्याकडून डॉ. संदीप माने यांनी सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. या वेळी डॉ. संजीव पाटील यांना संस्थेचे कोषाध्यक्ष करण्यात आले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, कर्जत मेडिकल असोसिएशनचे वरिष्ठ सदस्य डॉ. मनोहर साबणे, डॉ. हेमंत गंगोलीया यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply