Breaking News

श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -रविशेठ पाटील ; कळंबोलीत मुस्लिम समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली : प्रतिनिधी

लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कळंबोली शहर व परिसरात विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. या विकासकामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला कळंबोली शहरात सर्व समाजातून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन  भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी केले.

 29 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, नगरसेविका प्रमिला रविशेठ पाटील, नगरसेवक अमर पाटील, जिल्हा महानगरप्रमुख रामदास शेवाळे, सल्लागार बबन पाटील, नगरसेविका महानव, शिवसेना कळंबोली शहरप्रमुख अविऩाश कोंडीलकर, विश्वास पेटकर यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात येत आहे. या प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या कळंबोली शहराची जबाबदारी माझ्यावर सोपविल्यापासून कळंबोलीकरांसाठी अनेक विकासाची कामे केली आहेत. कळंबोली शहरातील सेक्टर 16 ते 20मध्ये सतत भेडसावणारा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. विजेच्या लपंडावाने कळंबोलीमधील जनता हैराण होती. त्यांच्यासाठी सेक्टर 20मध्ये नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. अशी अनेक विकासाची कामे भाजपच्या माध्यमातून करण्यात आली आहेत आणि करीत आहोत. याच विकासाच्या जोरावर  आज कळंबोली शहरात भाजप, आरपीआय युतीचे पाच नगरसेवक आहेत, तर चार नगरसेवक काही फरकाने पराभूत झाले. त्यामुळे येथे अन्य पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन भाजपला पसंती देत पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कळंबोलीत भाजपला चांगले दिवस असून मुस्लिम बांधवांचाही युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply