उरण : वार्ताहर
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार उरण शहरात घरोघरी सुरू आहे. त्यास मतदारांचा उत्तम प्रतिसादही लाभत असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या वतीने उरण शहर हद्दीतील प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 या भागात जाऊन नागरिकांना खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांची परिचयपत्रके देऊन कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी त्यांचा प्रचार केला. मोरा कोळीवाडा, बोरी, मांगीरदेव झोपडपट्टी, कुंभारवाडा आदी ठिकाणी घरोघरी व दारोदारी जाऊन प्रचार करण्यात आला. या वेळी नगरसेवक नंदकुमार लांबे, अतुल ठाकूर, नगरसेविका अॅड. वर्षा अरुण पाठारे, विद्या म्हात्रे, भाजपच्या उरण शहर महिला मोर्चा अध्यक्ष संपूर्णा थळी, शिवसेना शहर उपप्रमुख प्रवीण थळी, संपर्क संघटक वंदना पवार, संघटक मेघा मेस्त्री, माजी नगराध्यक्ष वैशाली बंडा, माजी नगरसेविका हेमांगी पाटील, कैलास पाटील, रजिया शेख, विकास कडू, पुष्पा लवेकर, सुनील फेगडे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– बालई, कोटनाका येथेही प्रचार
उरण : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना आमदार मनोहर भोईर व भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील बालई, कोटनाका येथे शिवसेना, भाजप, आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. या वेळी शिवसेना उपविभागप्रमुख रवींद्र पाटील, शाखाप्रमुख सुरज मढवी, उपशहरप्रमुख अरविंद पाटील, भाजपचे हेमंत भोंबले, राजेश म्हात्रे, प्रीतम पाटील, योगेश म्हात्रे, भारत पाटील, संदीप पाटील, राकेश पाटील, निखिल माळी, हर्षद माळी, नयन भोईर, वीरेंद्र भोईर, निशांत भोईर, दीपक म्हात्रे, मृणाल पाटील, सोहम शिरढोणकर आदी प्रचारात सहभागी झाले होते.