Breaking News

खोपोली शहर परिवहन सेवा सुरू करावी

भारतीय जनता पक्षाची नगरपालिकेकडे मागणी

खोपोली : प्रतिनिधी

शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची शाळेत येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते, यासाठी खोपोली शहर परिवहन सेवा जी बंद आहे, ती तात्काळ नगरपालिका प्रशासनाने सुरू करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. 14) भाजपच्या वतीने उपमुख्यधिकारी भंगाळे यांना देण्यात आले.

भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, सहचिटणीस प्रमोद पिंगळे, ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख, महिला मोर्चाच्या जिल्हा कोषाध्यक्षा रसिका शेटे, चिटणीस सुनिता महर्षी, विमल गुप्ते इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply