Breaking News

अजित पवारांना मोठा धक्का; जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा

सातारा ः प्रतिनिधी

सातार्‍यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बर्‍याच सभासदांनी कारखाना सभासदांच्या ताब्यात यावा अशी प्रमुख मागणी किरीट सोमय्या यांच्याकडे केली. कारखाना चांगला सुरू होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्रही मोठे होते, मात्र त्या वेळी कारखाना कवडीमोल भावाने कारखान्याचा व्यवहार केला. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. सत्तेच्या जोरावर बेकायदेशीररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आलाय. पुन्हा कारखाना सभासदांचा व्हावा. तुम्हाला आवाहन करतो की, तुम्ही काही करा कसेही करा आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या, अशी मागणी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांनी सोमय्यांकडे कारखाना स्थळावरच केली होती. त्यावर सोमय्या यांनी यावेळी शेतकर्‍यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही, मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल, असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अजित पवारांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालयानेदेखील (ईडी) जप्तीची कारवाई केली होती.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply