Breaking News

वाडगाव येथील कुस्ती स्पर्धेत गावदेवी आंदोशी संघ विजेता

प्रथम क्रमांकाची मानाची गदा पारनेरच्या ॠषीकेश हांडे यांने पटकावली

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे हनुमान तालिम संघ व वाडगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आंदोशी संघ विजेता ठरला, तर टाकादेवी मांडवा द्वितीय आणि जय हनुमान तालिम संघ-पनवेल तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कुस्ती ॠषीकेष लांडे याने जिंकली, तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती गणेश कोकरे व तृतीय क्रमांकाची कुस्ती साहिल पोगांण यांनी जिंकली. या खुल्या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ मंगळवार (दि. 6) दुपारी चार वाजता आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाला. हनुमान तालिम संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र भगत शिवसेनेचे (शिंदे गट) राजा केणी, वाडगाव सरपंच सरिता भगत, उपसरपंच निलम थळे, मारूती हडकर, बेलोशी सरपंच कृष्णा भोपी, दीपक भुसारी, भगवान धुळे, अ‍ॅड. रत्नाकर पाटील या वेळी उपस्थित होते. या खुल्या कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, पनवेल, नवी मुंबई येथील नामांकीत मल्लांनी सहभाग घेतला होता. मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती पुणे हनुमान आखाड्याचा मल्ल श्रीनिवास पाथरूट व पारनेरच्या शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा मल्ल ॠषीकेश लांडे यांच्यामध्ये रंगली, यामध्ये ॠषीकेश लांडे विजेता ठरला, त्याने रोख रक्कम व मानाची गदा पटकावली. व्दितीय क्रमांकाची कुस्ती लोणंद (जि. पुणे) येथील लालमाती कुस्ती केंद्राचा मल्ल गणेश कोकरे व सोलापुरच्या गोदबा कुस्ती केंद्राचा मल्ल सुरज मुलानी यांच्यामध्ये झाली. त्यामध्ये गणेश कोकरे विजयी ठरला, तर तृतीय क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा साहिल पोगांण याने जिंकली. त्याने सोलापूरच्या दीपक गोफणे याला  पराभूत केले. अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र भगत आणि हनुमान तालिम संघाचे अध्यक्ष चद्रकांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.  या स्पर्धेसाठी प्रमोद भगत, आदेश पेके, अवि घासे, सुधाकर पाटील, मिलिंद भगत, प्रकाश भगत, नरेश भोपी, वैभव मुकादम, विलास पाटील यांची पंच कमिटी नियुक्त करण्यात आली होती. त्यांना नरेश कडू, प्रविण भगत, व संतोष भगत यांचे सहाय्य मिळाले. गुणलेखनाचे काम नितेश थळे यांच्यावर सोपविण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंलचान सुनिल थळे यांनी तर कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन पंढरपुरचे औदुंबर शिंदे यांनी केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply