‘सुफल आहार’तर्फे गरीब बालकांना मोफत जेवण

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा झोपडपट्टीतील मुलांना दररोज एक वेळचे मोफत जेवण देण्यात येत आहे. समाजातील गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, अन्नाअभावी बालकांचे मृत्यू होऊ नये, लहान बालकांचे कुपोषण होऊ नये. त्यांना चांगले सुदृढ जीवन जगता यावे या दृष्टिकोनातून ही सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यात सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा झोपडपट्टीतील मुलांना दररोज एकवेळचे मोफत जेवण देण्यात येत आहे.

उरणमधील महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी कोरोना काळात गोरगरीब कुटुंबातील लहान मुलांना, बालकांना दररोज मोफत अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळापासून सुरू असलेले अन्नदान आजही अविरतपणे, निस्वार्थी भावनेने, निरपेक्षपणे चालू आहे. सुफल आहारच्या माध्यमातून गोरगरीब समाजातील लहान मुलांना एकवेळचे पोटभर अन्न मिळत असल्याने मुलांची होणारी हेळसांड आता थांबली आहे. मुलांना दररोज सकस आहार वेळेत मिळावा यासाठी प्रियांका सिंग, ईश्वरी कोंडीलकर, हंसराज चव्हाण, पप्पू सूर्यराव, सचिन उकार्डे, शिवानी कोळी, स्मिता नाखवा, सुरज सिंग, विकास शर्मा, प्रसाद पाटील, बादल म्हात्रे, पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्यासह सुफल आहाराची संपूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत घेत आहे. ज्या व्यक्तींना अथवा सामाजिक संस्थांना या कार्यात हातभार लावायचा असल्यास त्यांनी सुफल आहार प्रमुख सारिका पाटील (मो. क्र. 9664979696) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुफल आहारच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply