पणजी ः काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे न थांबवल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला आहे. आम्ही कोणीही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू, असे गृहमंत्री शाह म्हणाले. गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. दोन्ही देशांदरम्यान चर्चेची एक वेळ होती, मात्र आता ती वेळ राहिली नसून जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …