धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन व जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. अलिबाग-मुरूड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले, पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.