Breaking News

पेणमध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा

पेण : प्रतिनिधी

शहरात सोमवारी (दि. 18) पोलीस भरती लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील परीक्षार्थी पेणमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या परीक्षेसाठी  पेण शहरात सात केंद्रावर 2160 परीक्षार्थीची आसन व्यवस्था करण्यात आली होती.

पेण शहरातील सार्वजनिक विद्यामंदिर, केईएस स्कुल, प्रायव्हेट हायस्कुल, ज्युनिअर कॉलेज, भाऊसाहेब नेने कॉलेज, पतंगराव कदम कॉलेज आणि शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय या केंद्रांवर सोमवारी पोलीस भरती लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी रविवारी रात्रीपासून परजिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थीची निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली होती.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply