नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.
नेट प्रॅक्टिस करीत असताना जसप्रीत बुमरहाचा चेंडू विजय शंकरच्या पायाला लागला होता. सुरुवातीला ही गंभीर दुखापत नसल्याचे सांगत विजय शंकर पुनरागमन करणार असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र ही दुखापत गंभीर असून शंकरला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन मयांक अग्रवालला पाचारण केले आहे.