Breaking News

नागोठणे ग्रामदैवतांचा पालखी सोहळा

नागोठणे : प्रतिनिधी

येथील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा 47 तासांनी पूर्ण झाला. शनिवारी मंदिरातून काढण्यात आलेली पालखी सोमवारी (दि. 22) सकाळी 9 वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास शनिवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता देवीचे भक्त मधुकर पोवळे यांच्या हस्ते पूजा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी विश्वस्त मंडळाचे नरेंद्र जैन, दिलीपभाई टके, जयराम पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, विनायक गोळे, अनिल नागोठणेकर, बबन मोरवणकर, किरण लाड आदी पदाधिकारी, तसेच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जोगेश्वरी मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयामार्गे बंगलेआळी, कासारआळी, शिवाजी चौक, कोळीवाडा, बाजारपेठ, गुरवआळी, गांधी चौक, प्रभुआळी, गवळआळी, मराठआळी, कुंभारआळी, प्रभुआळी, ब्राह्मणआळी, आंगरआळी, जोगेश्वरीनगर, रामनगर, शांतीनगर, सूर्यदर्शन कॉलनी, खडकआळी आदी भागात पालखी फिरवण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी 9 वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाले. देवतांचे मुखवटे मंदिरात नेल्यानंतर आरती करण्यात आली व मानाच्या श्रीफळाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पालखीचे स्वागत करण्यासाठी शहरातील सर्वच आळ्यांमध्ये प्रत्येकाच्या दारासमोर आकर्षक रांगोळी, तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, तसेच सदस्य आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply