मुंबई ः प्रतिनिधी
यंदा भारताच्या वनडे विश्वचषक विजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद घेत आहेत.
ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केलेल्या फोटोत अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ शेजारी बसलेले दिसत आहेत. हे दोघेही खेळाडू आता आयपीएल गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper