Breaking News

नवाब मलिक यांना ईडीचा दणका

वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणार्‍या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. मंत्री नवाब मलिक यांना हा मोठा झटका मानला जात आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील राज्यातील ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणार्‍या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे.
मी 3 नोव्हेंबरला ईडीकडे तक्रार दिली होती. वक्फ बोर्डाच्या मालकीची ही चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने नऊ कोटी साठ लाख रुपये त्या ट्रस्टला दिले. त्यासाठी वक्फ बोर्डाच्या सीईओंनी एनओसी दिली होती. त्यामुळे यामध्ये मोठे लोक सहभागी असू शकतात. मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही पण यामध्ये मोठे लोक असू शकतात. हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे. ईडीने इतक्या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी आहे, असे
वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी म्हटलेय.
अमृता फडणवीस यांनी मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासंदर्भात गायलेल्या गाण्याचे फायनान्स ड्रग्स पेडलर जयदीप राणा याने केले होते, असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मलिकांच्या या आरोपानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुढील 48 तासांत मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा,
असा इशाराच अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही दिलाय.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply