Breaking News

‘छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही’, उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाकडूनही संजय राऊतांचा निषेध

मुंबई : प्रतिनिधी

’छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची सातार्‍याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल’, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी करुन शिवसेना नेते संजय राऊत  यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच, भाजपच्यावतीने एक पत्रकही जारी करण्यात आले आहे.

शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणार्‍या भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. या विधानावर भाजप नेत्यांनी राऊत यांना लक्ष्य केले आहे. तसेच, सकल मराठा समाजाकडूनही राऊतांचा निषेध नोंदविण्यात येत आहे.

उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून राऊत यांना इशारा देण्यात आला आहे. तुम्ही राजकारणात कोणाचे नाव घेऊ आहात हे तपासा. छत्रपतींच्या घराण्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यास त्याला सोडणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी राऊत यांना दिला. त्यानंतर, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही परिपत्रक जारी करत छपत्रतींच्या घराण्यासंदर्भात अपशब्द कदापि खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. संजय राऊत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या विधानावर छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच  आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा असेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply