तोटा होत असल्याने सेवा सुरू करण्याची मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत 180 विद्युत बस दाखल झाल्या आहेत, मात्र यातील फक्त 50 बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. 130 बस या एनएमएमटीच्या बसस्थानकात पडून आहेत. विद्युत बस सुरू करण्याबाबत परिवहन प्रशासनाचे नियोजन नाही. 130 पर्यावरण पूरक विद्युत बस करावे सेक्टर 48 आणि सारसोळे बस आगारात धूळखात उभ्या आहेत.
कोरोनानंतर एनएमएमटीचा तोटा वाढला असून यात तीन कोटींची भर पडली आहे. परिवहनकडे एकूण 400 बसगाड्या आहेत. त्यातील 300 बसगाड्या सध्या प्रवाशी वाहतूक करीत आहेत. यात 50 विद्युत तर 220 या डिझेल आणि सीएनजीवरील आहेत. डिझेलवर चालणार्या बसला प्रति 250 ते 300 किलोमीटर अंतरासाठी दिवसाला 10 हजार ते 12 हजार रुपये खर्च येतो.
या 130 बस सेवा देत असून त्यांचा दिवसाला 15 लाख ते 16 लाख तर महिन्याला तीन ते चार कोटी इंधनावर खर्च होत आहे. त्यामुळे 120 विद्युत बसगाड्या सेवेत दाखल झाल्या तर हा खर्च कमी होणार आहे.