Breaking News

अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा

कर्जत : बातमीदार

नेरळजवळील धामोते गावातील प्रवीण दिनकर विरले यांनी आपला वाढदिवस वांगणी येथील किनारा अनाथाश्रमात जाऊन तेथील अनाथ, अंध आणि अपंग मुलांसमावेत साजरा केला. या वेळी प्रवीण विरले अनाथाश्रमातील मुलांना बिस्किटे, चॉकलेट, पाण्याच्या बॉटल, शीतपेय आणि खेळणी भेट दिली. या वेळी पवन विरले, विनायक तांबोळी, हरेश मुंढे, राहुल कोल्हे, संदीप मसने आदी उपस्थित होते. किनारा अनाथाश्रममधील 20 मुले आणि चार शिक्षकांना भेटवस्तूही देण्यात आल्या.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply