उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यात असलेल्या जेएनपीटी बंदरात 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. येथील दक्षता जागरुकता सप्ताह-2021 ची थीम आहे ‘स्वतंत्र भारत 75 सचोटीसह स्वावलंबन’. यामध्ये दक्षता जागरुकता सप्ताहादरम्यान इन्फॉर्मर (पीआयडीपीआय), दृढनिश्चय करणे, अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा आणि इतर हाऊस किपिंग क्रिया कला, भ्रष्टाचार निर्मूलन यावरदेखील लक्ष केंद्रित केले आहे.
पैशाची कोणतीही मागणी न करता काम करण्याचे, भ्रष्टाचार ही कीड असून त्याचा नायनाट करणे हे आपले कर्तव्य असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी मुख्य दक्षता अधिकारी विद्याधर मालेगावकर, कुमार एम. अंकलेकर, सहायक व्यवस्थापक (दक्षता) जितेंद्र आर. गद्रे, अधीक्षक (दक्षता) विश्वास बी. खैरनार, सहायक अभियंता (दक्षता) प्रशांत एस. शुक्ला, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.