पनवेल : रामप्रहर वृत्त
असोसिएशनमधील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले.
नवीन पनवेलमधील ई 1 ते 5 मधील पाणीपुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी ई 1 ते 5 मधील रहिवाशांनी सभापती सुशिला घरत यांना धन्यवाद देत आभार मानले.