Breaking News

सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चातून पाईपलाईनचे काम

पनवेल : रामप्रहर वृत्त

असोसिएशनमधील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले.

नवीन पनवेलमधील ई 1 ते 5 मधील पाणीपुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी ई 1 ते 5 मधील रहिवाशांनी सभापती सुशिला घरत यांना धन्यवाद देत आभार मानले.

Check Also

निमित्त जागतिक हास्य दिनाचे : मराठी चित्रपटांनी खूप खूप हसवले…

खरंतर दररोज हसत हसत जगायला हवं. त्यामुळे मानसिक, भावनिक, शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या आपण एकदम फिट …

Leave a Reply