Breaking News

वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीवर कारवाई

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा गुरुवारी (दि. 28) उद्ध्वस्त केला.

या कारवाईत 200 लिटर क्षमतेचे तीन प्लास्टिक ड्रममध्ये व 200 लिटर क्षमतेची एक पत्र्याच्या टाकी, यात तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेले एकूण 800 लिटर रसायन मिळून आले.हे रसायन जागीच ओतून नाश करून तीन प्लास्टिकचे ड्रम जाळून नष्ट करण्यात आले व एक पत्र्याची टाकी तोडून नुकसान केले आहे.

रसायनी पोलिसांनी तीन महिन्यांच्या कालावधीत गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केलेली ही सातवी कारवाई आहे. तसेच वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा हातभट्टीवर छापा टाकण्याची ही पाचवी वेळ आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply