Breaking News

रोहित शेखर हत्येप्रकरणी पत्नीला अटक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

माजी केंद्रीय मंत्री एन. डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. फॉरेन्सिक तपासणीतील पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहत होते. रोहित यांचा 16 एप्रिल रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. रोहित शेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी अखेर रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. अपूर्वा यांची तब्बल तीन दिवस चौकशीदेखील करण्यात आली.

अपूर्वाने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी घरी कोणीही नव्हते. यादरम्यान पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि अपूर्वाने संतापाच्या भरात गळा दाबून पतीची हत्या केल्याचे समजते. आईनेही व्यक्त केला होता संशय रोहितचे पत्नीशी संबंध सौहार्दाचे नव्हते. तो त्याची राजकीय कारकीर्द सुरू होत नसल्याबाबत निराश होता, असे रोहित शेखर यांच्या मातोश्री उज्ज्वला यांनी सांगितले होते.  2018मध्ये शेखर व अपूर्वा यांचा प्रेमविवाह झाला होता. विवाहाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात कुरबुरी होत्या, असेही त्यांनी म्हटले होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply