Breaking News

देशी कट्ट्यासह काडतुसे हस्तगत

मुंबई ः प्रतिनिधी

खार रेल्वेस्थानक परिसरातून काल देशी कट्टे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. खारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चेतन चंदू पटेल (29) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने ही शस्त्रे कुठून आणली तसेच कोणाला देण्यासाठी आणली होती याबाबत खारचे पोलीस निरीक्षक दया नायक आणि पोलीस उपनिरीक्षक काटकर अधिक चौकशी करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली होती. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा पिस्तूलसारखे हत्यार घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो. नि. शाहूराज साळवे यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचत रवी दाढीला अटक केली होती. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. कोळसेवाडी पोलीस स्थानकात रवीविरुद्ध सहा गुन्हे दाखल असून यापैकी तीन प्रकरणांत तो फरार होता. रवी या परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली होती.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply