Breaking News

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -राम मोहिते

वळके हायस्कूलच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन

रेवदंडा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जेएसडब्ल्यू कंपनीचे सिएसआर विभाग प्रमुख राम मोहिते यांनी बुधवारी (दि. 27) वळके येथे केले.

साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजीक दायित्व विभागाच्या वतीने कोएसोच्या वळके येथील नारायण कमळ्या गायकर माध्यमिक शाळेत नवीन प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन बुधवारी जेएसडब्ल्यू कंपनीचे प्रसाद डहाळे यांच्या करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात राम मोहिते बोलत होते. वळके हायस्कूलला संरक्षक भिंत बांधून देण्याचा  प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कमळाकर फडतरे यांनी केले. जेएसडब्ल्यू कंपनीचे एस. पी. शर्मा, राकेश चवरकर, मंगेश शेडगे, वळके हायस्कूलचे चेअरमन मधुशेठ पाटील, पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत मोहिते, वळके सरपंच किशोर काजारे, उपसरपंच विजय म्हात्रे, प्राचार्या स्नेहल म्हात्रे, मुख्याध्यापक नितिन पाटील, शिक्षक दीपक भगत, जनार्दन भगत, शरद चवरकर, सुरेश नांदगावकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. मोरे सर यांनी आभार मानले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply