Breaking News

उरण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचे वाटप

उरण : प्रतिनिधी

उरण नगर परिषद कर्मचार्‍यांना भरीव असे सानुग्रह अनुदान रक्कम 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी सर्व गटनेते आणि नगरसेवक, नगरसेविका यांचे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी आभार मानले. कोरोनाच्या कालावधीत उरण नगर परिषदेच्या कामगारांनी उत्कृष्ट कामगिरी करून जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले. त्या कार्याला विचारात घेऊन म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनने केलेल्या मागणीची दखल घेत सानुग्रह अनुदानाची रक्कम 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले. युनियनने सालाबादप्रमाणे दिवाळी सणानिमित्त केलेल्या सानुग्रह अनुदानाच्या मागणीला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार, उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे आणि कामगारांनी जाहीर आभार मानले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply