पोलादपूर विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींना सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन

पोलादपूर : प्रतिनिधी

समाजातील नातेवाईक, मित्रपरिवार, तसेच आप्तशेजारी यांच्यापासून महिलावर्गाला विविध प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागू नये, यासाठी वेळीच सावधपणे प्रतिकार करण्याची समयसूचकता दाखविण्याची आवश्यकता असल्याचे मत महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी व्यक्त केले. पोलादपूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर विद्यामंदिर येथे विद्यार्थिनींसोबत डीवायएसपी नीलेश तांबे यांनी संवाद साधला. या वेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव उपस्थित होते.

या वेळी डीवायएसपी तांबे यांनी विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरण महिलांविषयक अत्याचार, गुड टच व बॅड टच, तसेच सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन केले. पोलीस विभागाकडून राबविण्यात येणार्‍या पोलीस काका, तसेच पोलीस दिदी या संकल्पनेची माहिती दिली. या वेळी पोलीस नाईक इक्बाल शेख, महिला पोलीस नाईक शिरगावकर, तसेच कार्यक्रमाकरिता 100 विद्यार्थिनी हजर होत्या.

Check Also

Jedes Online Spielbank wird beflei?igt, stets neue Fans anzuziehen

Nahe den Freespins eignen zudem mehr als einer weitere Optionen gebraucht, um Neukunden nach vollbringen …

Leave a Reply