Breaking News

मिनिट्रेन घडविणार माथेरानमधील पर्यावरण आणि संस्कृतीचे दर्शन

कर्जत : प्रतिनिधी

युनोस्कोमुळे माथेरानचे पर्यावरण जगाला कळणार असून मिनिट्रेनच्या माध्यमातून ते दाखवणार असल्याचे   विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले. नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेनला युनोस्कोमध्ये स्थान मिळाल्यानंतर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान रेल्वे स्टेशन सुशोभित करणे, पर्यटकांना रेल्वेच्या सोयी-सुविधांची पाहणी, तसेच माथेरानमधील पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माथेरान भेटीला आले होते.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान नगरीच्या अमनलॉज स्थानकात दाखल झाल्यानंतर संपूर्ण स्थानकाची पाहणी केली. तसेच अधिकार्‍यांना आवश्यक सूचनाही केल्या. दरम्यान, रेल्वेची अनेक कामे सुरू असून नवीन सिमेंटची स्लीपर येत आहेत त्यापैकी काही स्लीपर येऊन प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत आणि ते यशस्वी झाल्याचे बोलले जाते. दरडग्रस्त जागेवरील जुने रेल्वे रूळ काढून नवीन रूळ टाकण्यात आले. रुळाच्या खालील वाहून गेलेल्या जमिनीवर गॅबियन टाकण्यात येत आहेत.हा 21 किलोमीटरचा मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी ट्रॉलीचा देखील उपयोग करण्यात येत आहे.

माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारी आणि आबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नेरोगेज माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हेरिटेजसाठी सज्ज झाली आहे. युनोस्कोचा पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून दुसर्‍या फेरीकडे योग्य वाटचाल सुरू आहे. आपल्या माथेरानची राणीही युनोस्कोच्या हेरिटेजसाठी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. यापूर्वी देखील 2002 सालीच्या दरम्यान युनोस्कोकडून माथेरान मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा देण्यासाठीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता, परंतु आता माथेरान मिनिट्रेन ही युनोस्कोचे हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माथेरानच्या राणीला हेरिटेज दर्जा प्राप्त झाल्यास माथेरानच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply