Breaking News

रसायनमिश्रित फटाक्यांचा साठा जप्त

देवन्हावे येथे छापा; खोपोली पोलिसांची कारवाई

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

पर्यावरणास घातक असणार्‍या विविध रसायनमिश्रित फटाक्यांचा मोठा साठा खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील गोदाममधून छापा घालून जप्त करण्यात आला.

रसायनमिश्रीत फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत. या रसायन मिश्रीत फटाक्यांमुळे विशेषता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व आजारी माणसाला त्रास होतो.

बेरियम सॉल्ट नावाचे घातक रसायन फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे, बंदी घातलेल्या फटाक्यांचे उत्पादन व विक्री होताना दिसल्याने अशा फटाक्यांवर न्यायालयाने प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत, अशा फटाक्यांचा ीरींहूरलहरपळूीं शोध घेत त्यावर कारवाई करण्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक दुधे यांनी आदेश दिले आहेत.

खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात शोधमोहीम राबविण्यात आली. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवन्हावे येथील एस. पी. इंटरप्राईजेस येथील गोदामावर छापासत्र करून पोलिसांनी 18 लाख 44 हजार 231 रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस  अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply