Breaking News

शांतीवन येथे श्रमसंस्कार शिबिर

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 18 ते 24 जानेवारीदरम्यान पनवेल तालुक्यातील शांतीवन येथे राबविण्यात येणार आहे. शिबिराचे ‘रयत’चे जनरल बॅाडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) उद्घाटन करण्यात आले. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, रेखा मॅडम, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply