नवी मुंबई : प्रतिनिधी
वस्ताद लहुजी साळवे यांची 227वी जयंती वाशी येथील असंघटित नाका कामगारांनी साजरी केली. प्रारंभी, वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
या वेळी कामगारांना मार्गदर्शन करताना वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेल्या कार्याची महती सांगण्यात आली. विजय गायकवाड, वाशी नाका कामगार कमिटीचे राजू घोडे, राजेश पारवे, कृष्णा घटोळे, अशोक चव्हाण, लक्षण थोरात, रामकीसन तांबे, जनार्धन थांबे, राजू घटोळे, नामदेव भिसे, गोपीनाथ तांबे, अनिल तांबे, शिवाजी कांबळे, राजू गायकवाड, राजू उबाळे, शिवाजी वंजारे, योगेश रोकडे, धीरज पाटोळे आदी उपस्थित होते.