कर्जत, नेरळ ः बातमीदार
माथेरानमध्ये पर्यटनास आलेल्या व्यक्तीकडून त्याच्यासोबत असलेल्या महिलेचा शिरच्छेद करून तिचे शीर घेऊन तो पसार झाला आहे. या महिलेचे शीरविरहित प्रेत निर्वस्त्र अवस्थेत रविवारी (दि. 12) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या जोडीने लॉजमध्ये प्रवेश करताना अमजद खान आणि रुबिना बेन अशी नावे नोंदवली होती, तर मोबाईल नंबर अयोग्य आहे. लॉजमधील स्वच्छता कर्मचार्याला सकाळी महिलेचा मृतदेह पलंगाखाली दिसून आला. दरम्यान, हा मृतदेह कळंबोली एमजीएम रुग्णालयातील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येणार आहे.