Breaking News

आदई तलाव परिसर झाला स्वच्छ

पनवेल ः प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर पनवेल महापालिकेच्या वतीने आपल्या हद्दीत स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेलसाठी प्रभाग समिती ब अंतर्गत प्रभाग क्रमांक 16मधील आदई तलाव येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 12) करण्यात आले होते. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, विविध 35 सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. महापौर डॉ. कविता चौतमाल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, उपायुक्त गणेश शेट्टे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, स्वच्छ भारत अभियानच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे, कनिष्ठ सल्लागार सदाकत अली अन्सारी, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक अजिंक्य हळदे, पर्यवेक्षक संतोष गायकवाड, संदीप कांबळे, साई गणेश इंटरप्रायझेसचे व्यवस्थापक राकेश भुजबळ, सुपरवायझर चिन्मय घरत या मोहिमेत सहभागी झाले होते. या वेळी आदई तलाव व परिसरातून अंदाजे 10 टन कचरा गोळा करण्यात आला. नागरिकांनी कचरा, निर्माल्य तलावात न टाकता येथे ठेवण्यात आलेल्या मोठ्या कलशांमध्ये टाकावा, जेणेकरून तलाव आणि परिसर स्वच्छ राहील, असा संदेश सर्व उपस्थितांनी दिला. महापालिकेच्या वतीने उपस्थित सर्व सामाजिक संस्था, महाविद्यालयांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असलेला स्वच्छतादूत पुरस्कार देऊन गौरविण्यात येऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply