कर्जत : प्रतिनिधी
चारित्र्याच्या संशयावरून माथेरानमध्ये पत्नीची हत्या करणार्या पतीला कर्जत येथील न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
माथेरानच्या इंदिरा गांधी नगरमधी एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात या महिलेचा पती रामसिलोचन पाल याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने शीर वेगळे केल्याचे उघडकीस आले होते. रायगड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 24 तासात आरोपी रामसिलोचन पाल याला नवीन पनवेल येथील घरातून ताब्यात घेतले होते. त्याला कर्जत न्यायालयात हजर केले असता 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper