पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 19) विविध ठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धांना सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर असून ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजिल्या जात आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील धानसर येथे जय गणेश्वर संघाच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंना गौरविण्यात आले. पनवेल शहरातील उरण नाका येथील मैदानावरही आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या स्पर्धेलाही भेट देऊन आयोजक व स्पर्धकांचा उत्साह वाढविला. या वेळी आयोजक यशवंत जाधव ऊर्फ बाब्या व सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले.