Breaking News

बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही -देवेंद्र फडणवीस

भंडारा ः प्रतिनिधी

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 19) महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्यात सरकार नावाचे अस्तित्वच दिसत नाही. हे तीनचाकी सरकार बेईमानीने तयार झालेले आहे आणि बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, असे फडणवीस म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारभेत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर समाचार घेतला. महाराष्ट्रातील अवस्था पाहून आता माध्यमेदेखील म्हणायला लागली आहे की, महाराष्ट्रातील सरकार आहे कुठे? महाराष्ट्राच्या जनतेच्या मुळावर उठलेले सरकार अशी यांची अवस्था आहे, असे सांगून विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला, असा आरोप फडणवीस यांनी केला. गरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी, महिला, युवक या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचा आक्रोश थांबवण्यासाठी जे कृती करतात त्याला सरकार किंवा शासन म्हटले जाते, मात्र आता जे सरकारमध्ये आहेत त्यांना जनतेशी घेणेदेणे नाही. ते केवळ माल कमवत आहेत, भ्रष्टाचार करीत आहेत. एक प्रकारे माफियाराज महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply