Breaking News

आधुनिक तंत्रज्ञान अवगत करा -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्थेतील प्रत्येक सेवकाने आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा योग्य वापर प्रशासनामध्ये केला पाहिजे. आज आपणा सर्वांस अपेक्षित परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलले पाहिजे तरच आपली व देशाची प्रगती होऊ शकते, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 21) येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेच्या रायगड विभाग कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने टॅली प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक करीत प्रशिक्षणाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले असताना संस्थेतील सेवक हा प्रशिक्षित झाला पाहिजे यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य एम. बी. शेख, ओएसडी शहाजी डोंगरे, विभागीय सहाय्यक अधिकारी एस. एस. फडतरे, आर. पी. ठाकूर यांच्यासह रायगड विभागातील विविध शाखांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी उपस्थित होते. रोहीदास्थाकुर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply