माणगाव : प्रतिनिधी
पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयात भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) औषधे व फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रारोगतज्ज्ञ डॉ. शंतनु डोईफोडे यांच्याकडे ढवळे यांच्या हस्ते रुग्णांकरिता औषधे देण्यात आली. या वेळी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. आविष्कार फाउंडेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे, संघटक भालचंद्र खाडे, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे, बाबुराव चव्हाण, संजय जाधव, समीर मोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते, सचिन देसाई, उपाध्यक्ष देवयानी मोरे, स्वप्ना साळुंके, नरेश पाटील यांच्यासह परिचारिका व रुग्णालय कर्मचारी या वेळी उपस्थित होते.