Breaking News

चला धावूया आरोग्य जागरूकतेसाठी! कामोठ्यात आज फन रन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठ्यातील छाबा फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 14) बालदिनानिमित्त 5 आणि 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करणे आणि वंचित मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना पोषक अन्न व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने या फन रनचे आयोजन करण्यात आले आहे. कामोठे सेक्टर 6मधील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात सकाळी 6.30 वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात होणार असून याच ठिकाणी सकाळी 8.30 वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल.  स्पर्धा 18 ते 30, 30 ते 45, 45 ते 60 आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिलांसाठी आहे. स्पर्धेत टी-शर्ट, नाश्ता, टाइमिंग चिप, पदक, ई-प्रमाणपत्र आणि विजेत्यांसाठी ट्रॉफी देण्यात येणार आहे. या वेळी सुमारे 50 एचआयव्ही पॉझिटिव्ह बालकांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

Check Also

पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील …

Leave a Reply