माथेरान : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमधील शिवसेनेच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला असून, येथील 52 किलोमीटर परिसरातील घराघरात जाऊन महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मतदारांबरोबर संवाद साधत आहेत.
श्रीरंग बारणे यांनी आपल्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेकदा माथेरानला भेटी दिल्या असून, येथील समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक केली आहे. त्याची जाण ठेवून येथील शिवसेना महिला आघाडीच्या सदस्यांनी गेल्या चार दिवसांपासून प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यामध्ये नगरसेविका, महिला संघटक तसेच वयोवृद्ध महिलादेखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन एकदिलाने श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी झटत आहेत.