Breaking News

ब्राह्मण सभेच्या वतीने सावरकर जयंती व व्यसनमुक्ती पथनाट्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने स्वा. सावरकर जयंती व व्यसनमुक्ती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल, सेक्टर 11 येथील सिडको उद्यानातील एम्फी थिएटरमधेे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नगरसेविका मुग्धा लोंढे, संवेदना रुग्णसेवा समितीचे प्रवर्तक प्रसाद अग्निहोत्री, शिवसेेेना महिला आघाडीच्या अपूर्वा प्रभू, भाजपा युवा मोर्चा पनवेल शहर सेक्रेटरी अयुफ अकुला, मनसे महिला आघाडीच्या वर्षा पाचभाई, सामाजिक कार्यकर्ते अस्लम नाईक, ललिता गोविंद, रामकृष्ण परब, कफचे अध्यक्ष मनोहर लिमये, अत्रे कट्टाचे प्रवर्तक अरविंद कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर सावरकर रचित गीतांचे समूहगायन, तसेच माझी जन्मठेप या आत्मचरित्रातील उतार्‍यांचे अभिवाचन झाले. गायकांना प्रतिभा कुलकर्णी यांनी संवादिनी, तर माधव भागवत याने तबलासाथ केली.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात व्यसनमुक्ती या विषयावरील पथनाट्याचे सादरीकरण ब्राह्मण सभेच्या कलाकारांनी केले. प्रसिद्ध लेखिका संगीता देशपांडे यांनी लिहिलेल्या या नाटिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मोहन हिन्दुपूर व वैैैशाली केतकर यांनी केले. या पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. संवेदना रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोलाचेे सहकार्य करणारे प्रसाद अग्निहोत्री यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कॅन्सरग्रस्त रुग्णांना सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टांचे अनेक अनुभव सांगून व्यसनांंपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply