Breaking News

मुरूड तालुक्यात 54 वीजचोरट्यांवर कारवाई

20 लाख रुपयांची दंडवसुली

मुरूड : प्रतिनिधी

वीजबिल जास्त येऊ नये म्हणून काही ग्राहक विविध क्लृप्त्या वापरून मीटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी करीत असतात. मुरूड तालुक्यातील वीजचोरी करणार्‍या 54 ग्राहकांवर महावितरणने धडक कारवाई करून सुमारे 20 लाख तीन हजार 461 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत मुरूड महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून 42 लोकांना वीजचोरी करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 13 लाख 34 हजार 531 रुपयांचा दंड वसूल केला, तर वीजचोरी करणार्‍या मुरूड शहरातील 12 ग्राहकांकडून सहा लाख 68 हजार 930 रुपयांचा दंड वसूल केला.

मुरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी पकडून महावितरणने दंड वसूल केला असून, ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.

-महादेव दातीर, उपमुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, मुरूड

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply