

कर्जत : प्रतिनिधी
33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उद्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी -ठाकूर यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (एतच) सोबत वोटर व्हेरिफाईबल पेपर ऑडिट ट्रायल (ततझढ) वापरण्यात येणार असून याद्वारे मतदार आपले मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला दिले गेले आहे याची खात्री करून घेऊ शकतील, तसेच व्हीव्हीपॅटद्वारे मुद्रित केलेली मतपावती त्याच यंत्रामध्ये सात सेकंदासाठी पाहू शकाल. मतदाराला मतदानाचा हक्क व्यवस्थितरीत्या बजावता यावा म्हणून सर्व निवडणूक यंत्रणा विशेष काळजी घेत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी पदापासून ग्रामपातळीवरील कोतवालापर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी निवडणुकीची पूर्वतयारी करत आहेत.
दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे, महसूल अधिकारी, झोनल अधिकारी यांनी दिव्यांग मतदार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात माहिती दिली आहे. साधारण सकाळी 9च्या सुमारास दिव्यांग मतदारांना मतदानासाठी आणण्यात येणार आहे, 223 मतदान केंद्राच्या ठिकाण परिसरात 227 व्हीलचेअर उपलब्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली, तसेच लहान मुलांना मतदान केंद्रावर घेऊन येणार्या महिलांसाठी पाळणा घराची व्यवस्था मतदान केंद्राच्या परिसरात करण्यात आली आहे.
कर्जत शहरात अभिनव ज्ञान मंदिर शाळेत असलेल्या 171 मतदान केंद्रात (सखी मतदान केंद्र) बनविण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर महिला केंद्राध्यक्षापासून महिला पोलीस कर्मचारी म्हणजे हे केंद्र महिला संचालित केंद्र असणार आहे.
मतदान केंद्रात अंध व्यक्ती मतदारासाठी इव्हीएम मशीनवर ब्रेल लिपीची सुविधा
पुरुष आणि महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था
मतदान केंद्रामध्ये प्रत्येक पुरुष मतदारामागे दोन महिला मतदारांना प्रवेश देण्याची सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार मदत केंद्राची व्यवस्था
मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ये-जा करिता मोफत वाहतूक सुविधा
अंध तथा दुर्बल मतदारांसोबत सहचार्यास परवानगी
विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य
रॅम्प, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय
महिला संचालित मतदान केंद्र
RamPrahar – The Panvel Daily Paper