Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी

33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघातील चार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवली जाऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कक्षेत कर्जत, नेरळ आणि माथेरान या तीन पोलीस ठाण्याचा समावेश आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951चे कलम 56 अन्वये कर्जत पोलीस ठाण्यातील 1 आणि नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा 2 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 93 अन्वये कर्जत पोलीस ठाण्यातील 4, तर नेरळ पोलीस ठाण्यातील 6 अशा 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस ठाणे खालापूर यांच्या कक्षेत खालापूर, खोपोली आणि रसायनी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951चे कलम 56 अन्वये खालापूर पोलीस ठाण्यातील 1 आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा 2 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 (3)अन्वये खोपोली पोलीस ठाण्यातील 10; तर रसायनी पोलीस ठाण्यातील 1 अशा 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 93 अन्वये खोपोली पोलीस ठाण्यातील 1 वर कारवाई करण्यात आली आहे. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत आणि खालापूर दोन उपविभागीय पोलीस ठाणे कार्यालय येतात. या मतदारसंघात चार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे, तर कलम 144 अन्वये 11 जणांवर, तर कलम 93 अन्वये 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कर्जत उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply