नवी दिल्ली ः भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत पदार्पणातच अशी कामगिरी करणारा लक्ष्य हा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने रविवारी (दि. 16) नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या लोह कीन य्यूचा 24-22, 21-17 असा पराभव केला. लक्ष्यने 54 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंगापूरच्या लोहला धूळ चारली. लक्ष्यने पराभूत केलेल्या लोहने किदाम्बी श्रीकांतचा डिसेंबरमध्ये पराभव करून जागतिक विजेतेपद पटकावले होते. दरम्यान, भारतीय खेळाडूंनी यंदा इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चिराग-सात्विक जोडीने पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकली, तर लक्ष्य सेनने एकेरीचे विजेतपद पटकाविले आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …