नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा
खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (सेंटर ऑफ एक्सलन्स) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (दि. 16) झाले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून, तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या असल्याचे आयोजकांनी सांगितले. सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले, तर आभार सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी मानले.