Breaking News

खारघर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर येथील डी-मार्टजवळील नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यरूग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या केंद्रात सुरू करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आदींच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) झाले.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यारूग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहे. या केंद्रात ओपीडी अंतर्गत डॉक्टर, विशेष तज्ञांकडून सल्ला, प्रसूतीपूर्व सेवांतर्गत दर बुधवारी गरोदर मातांची तपासणी, प्राथमिक उपचार, आपत्कालीन सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन, किरकोळ रेागांची बाह्यरूग्ण सेवा, लेप्रसी, कुष्ठरोग यासारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी, प्रतिबंध नियंत्रण व नियोजन, नवजात अर्भक व नवजात शिशूंसाठी आरोग्य सेवा, लसीकरण, कोविड लसीकरण, समुपदेशन सेवा या अंतर्गत बाल्यावस्था व किशोरवयीन सेवा, कुटूंब नियोजन गर्भनिरोधक व प्रजननसंबधी इतर आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य तपासणी, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, टिळक विद्यापीठाच्या डॉक्टरांच्या माध्यामातून फिजोथेरपी, तसेच लॅब टेस्ट यामध्ये कंप्लिट ब्लड काऊंट, रक्तातील साखर, थायरॉईड, मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही चाचण्या केल्या जाणार आहे.
या सेवांचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, आयुक्तांसह स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग ‘अ’च्या सभापती संजना कदम, नगरसेवक निलेश बावीस्कर नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस किर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम  महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, टिळक विद्यापीठाचे फिजीओथेरपी डॉक्टरर्स, परिचारिका, नागरिक  उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply